केडगाव – येथील आयेशा गादी कारखान्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज शुक्रवार (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास घडली.
केडगाव-चौफुला रस्त्यावर असणाऱ्या आयेशा गादी कारखान्यात कारखाना वाढवण्यासाठी वेल्डिंग करण्याचे काम सुरू होते त्याची ठिणगी पडून दुकानातील गाद्या व कच्चा माल जळून खाक झाला.
यावेळी पोलीस प्रशासन, सरपंच नितीन जगताप यांनी दौंड नगरपालिकेस अग्निशामक बंब पाठवण्याची विनंती केली, त्यावेळी अग्निशमन बंब आल्याने आग आटोक्यात आली, परंतु गादी मालकाची आगीत मोठी हानी झाली आहे.