मुंबई – अभिनेता अजय देवगणसाठी यावेळीचा वाढदिवस खूप खास होता. एकीकडे भोलाची कमाई वाढत होती तर दुसरीकडे अभिनेत्याने त्याचा 54 वा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसोबत साजरा केला. यावेळी अजयने स्वतः आपल्या घराबाहेर येऊन चाहत्यांचे आभार मानले.
आपल्या आवडत्या स्टारला विष करण्यासाठी अनेक चाहते अजयच्या घराबाहेर जमले होते. यावेळी अजयने देखील चाहत्यांसमोर जात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याचा दरम्यानचा एका व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र यावेळी एका चाहत्याने केलेल्या कृतीमुळे अजय देवगनचा पार चडल्याचे दिसून आले.
अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. तो घराबाहेर पडताच चाहत्यांनी त्याला घेरले. सर्व चाहते अजय देवगणसोबत फोटो क्लिक करण्यासाठी उत्सुक होते.अजयने सर्वांसोबत सेल्फी काढले, पण त्याच दरम्यान एकाने असे काही केले की लगेचच अभिनेता संतापला. त्या चाहत्याने अचानकपणे अजय देवगणचा हात धरला. त्याने एका हाताने अभिनेत्याचा हात धरला आणि दुसऱ्या हाताने फोटो क्लिक करायला सुरुवात केली.हे पाहून अजय देवगण संतापला. त्याने कसेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आपला हात सोडवला.
View this post on Instagram
अजय देवगणच्या भोलाने थिएटरमध्ये तीन दिवसांत जवळपास 30 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळत आहे. त्याचबरोबर ‘भोला’ नंतर अजय देवगणचा पुढचा चित्रपट ‘मैदान’ असणार आहे. बोनी कपूर यांच्या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये अजय सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारत आहे.