मुंबई – बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगण कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्थान मिळवले आहे. अभिनेता आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याचा जन्म 2 एप्रिल 1969 रोजी दिल्लीत झाला. अजय देवगण अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. अजय देवगणने आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.नुकताच अजयने त्याचा जन्मदिवस मोठ्या थाटात साजरा केला. अजयची लाईफ स्टाईल नेमकी कशी आहे याबाबत आपण आता जाणून घेणार आहोत.
अजय देवगणने 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने ऍक्शन हिरो म्हणून काम केले, त्यानंतर त्याने जिगर, दिलवाले, हम दिल दे चुके सनम, द लिजेंड भगत सिंग, गोलमाल यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. द लिजेंड भगत सिंग या चित्रपटासाठी अजयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.
हाय क्लास लाईफस्टाईल असलेल्या अजयच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे 295 कोटींची संपत्ती आहे. तो अतिशय आलिशान जीवन जगतो. तो चित्रपटांमधून सर्वाधिक कमाई करतो, यासोबतच अजय अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसतो. समोर आलेल्या माहितीनुसार अजय देवगण एका चित्रपटासाठी 30 ते 50 कोटी रुपये फीज घेतो. राजामौली यांच्या आर आर आर या सुप्रसिद्ध चित्रपटामध्ये छोटा रोल करण्यासाठी अजयने तब्बल पंचवीस कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे.
अजय देवगणची मुंबईत दोन आलिशान घरे देखील आहेत. यासोबतच एक मोठा फ्लॅट सुद्धा आहे, जो जुहूमध्ये आहे.ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. अजय देवगणला महागड्या वाहनांची देखील खूप आवड आहे. वाहनांच्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, त्याच्याकडे टोयोटा सॅलिका, बीएमडब्ल्यू, फेरारी आणि क्वाट्रोपोर्टे आहेत. यासोबतच अजयकडे एक प्रायव्हेट जेट देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 84 कोटी रुपये आहे. तो अनेकदा आपल्या कुटुंबासह सुट्टीसाठी या जेटमध्ये जातो.
1999 मध्ये अजय देवगणने अभिनेत्री काजोलसोबत लग्न केले. या कपलला दोन मुले आहेत. अजय देवगणचा भोला हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.