पुणे – पुण्यात MPSC चे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. याआधी MPSC परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानुसार ती मागणी राज्य सरकारकडून मान्य देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पुण्यात MPSC चे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.
पुण्यातील बालगंधर्व चौकात MPSC चे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. टायपिंग स्किल टेस्टमध्ये अचानक बदल केल्याचा आरोप यावेळी विद्यार्थींनी केला आहे. मात्र टायपिंग स्किल टेस्ट नियमानुसार करण्याची मागणी विद्यार्थींकडून केली जात आहे. यासाठी पुण्यात स्पर्धा परिक्षचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क कौशल्य चाचणी बाबत हे आंदोलन करण्यात आले आहे. टायपिंग स्किल टेस्ट ही राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे. मात्र त्यात बदल केल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तसेच मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थींनी दिली आहे.
यापूर्वीही केले होते आंदोलन –
दरम्यान, MPSC चा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा. या मागणीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी राज्य सरकारने नवीन पॅटर्नबद्दल निर्णय जाहीर केला होता, मात्र त्याची अंमलबजावणी अधिकृतरित्या केलेली नव्हती. त्यामुळे हे आंदोलन केले होते.
MPSC चा अभ्यासक्रम 2023 पासून अचानक बदलण्यात आला होता. पण विद्यार्थी अनेक वर्षांपासून जुन्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करत होते. मेहनत वाया जाणार या कारणामुळे विद्यार्थ्यांनी दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलावा अशी मागणी केली होती.