#TataOpenMaharashtra : दुहेरीत रामनाथन-पूरव राजा उपांत्य फेरीत

पुणे : महाराष्ट्र राज्य लाॅन टेनिस असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित तिस-या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या रामकुमार रामनाथन व पूरव राजा या जोडीने वाईल्डकार्ड प्राप्त जोडी भारताचा अव्वल टेनिसपटू लिअॅण्डर पेस व आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन यांचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन या भारताच्या जोडीने भारताचा लिअॅण्डर पेस आणि त्याचा आॅस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांचा ६-२, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.