नवी मुंबईत भीषण आग : आग विझवताना 7 जवान जखमी

मुंबई : नवी मुंबईतील नेरुळच्या सीवूड सेक्‍टर मध्ये एका टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आगीवर नियंत्रण मिळवले असून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली आहे. आगीवर नियंत्रण मिळवत असताना अग्नीशमन दलाचे 7 ते आठ जवान किरकोळ जखमी झाले आहेत. या जवानांना उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॉवरच्या 20 आणि 21 व्या मजल्यावर ही आग लागली होती. या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाना सुरक्षित खाली उतरवण्यात आले. अग्निशमन दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी वित्तहानी टळली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.