इंदूर – इंदूरमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथील अपोलो टॉवर्समध्ये नोकरी करणाऱ्या पिडीत युवतीशी एकाने खोटे नाव सांगून मैत्री केली. मग तिच्यावर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केला आणि मग खरे नाव सांगून तिच्यावर धर्मांतरासाठी दडपण आणले. सदर युवतीने धमक्यांना भिक न घालता सरळ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.
आरोपीचे नाव अरबाज खान असून त्याने लाला या नावाने पिडीत युवतीशी ओळख करुन घेतली. नंतर कुटुंबाशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी नेले. येथे अरबाजने तिच्याशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर धर्म बदलाबाबत दबाव निर्माण करण्यात आला. पीडितेने आरोपीशी बोलणे बंद केल्यावर आरोपीने तिला धमकावून आपल्यासोबत नेले आणि पुन्हा मारहाण करून पीडितेवर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सांगितले की 2019 मध्ये ती अपोलो टॉवरमधील एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. येथे हरिजन कॉलनी येथील लाला उर्फ अरबाज कपडे खरेदी करण्यासाठी पोहोचला. यादरम्यान त्याची पीडितेशी ओळख झाली. याने पीडितेकडून मोबाइल क्रमांक घेतला. यानंतर अरबाजने तिला फोन करायला सुरुवात केली. अरबाजने आपले नाव लाला असे सांगून आपण हिंदू असल्याची बतावणी केली.
त्यानंतर अरबाजने प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. जून 2019 मध्ये अरबाज पीडितेला त्याच्या घरी घेऊन गेला. तो म्हणाला की तिला तिची पालकांशी ओळख करून द्यायची आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती अरबाजच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे कोणीही नव्हते. मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. यानंतर अरबाजने तिच्यावर बलात्कार केला. मग तिला तिचा धर्मही बदलावा लागेल, असेही त्याने सांगितले. हे ऐकून पीडितेला धक्काच बसला.
तेव्हा अरबाजने सांगितले की, त्याचे खरे नाव अरबाज आहे आणि तो मुस्लिम आहे. यानंतर मुलीने त्याला भेटणे बंद केले. त्यानंतर तरुणीने अपोलो टॉवरची नोकरीही सोडली. चार दिवसांपूर्वी पिडीतेने घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितला. कुटुंबासह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर तुकोगंज पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अरबाज खानला अटक केली.