केरळमधील नेत्याच्या मुला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

मुंबई – येथील ओशिवरा पोलीस ठाण्यात केरळमधील सीपीएम नेते कोडियेरी बालकृष्णन यांचा मुलगा बिनॉय विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली आहे.

याविषयी माहिती देताना शैलेश पासलवाड यांनी सांगितले की, बिनॉय आणि पीडित महिलेची ओळख डान्स बारमध्ये झाली होती. दोघांना 8 वर्षाचे एक मुल देखील आहे. याप्रकरणी भा. दं. वि. कलम 376 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

दुबईतील एका डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिलेची ओळख बिनॉयशी झाली. नंतर त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि 2010 साली बिनॉय पीडित महिलेला घेऊन मुंबईला आला आणि पश्‍चिम उपनगरात भाड्याने घर तिच्यासाठी घेतले. बिनॉयने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधातून त्यांना एक मुल देखील झाले. मात्र, अलीकडच्या काळात बिनॉय तिला सोडून गेला असून टाळाटाळ करत असल्याने पीडित महिलेने बिनॉयविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)