सोलापूरात यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग 

सोलापूर – पुणे वेधशाळेच्या वतीने यंदाही सोलापूर जिल्हा व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत सोलापूर विमानतळावर विमाने दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी यास दुजोरा देत पुणे वेधशाळेकडून पत्र प्राप्त झाले आहे, त्यानुसार परवानगी दिल्याचे सांगितले.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये जिल्ह्यात जून ते नोव्हेंबर महिन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. सर्व तहसीलदारांना याबाबत कळवण्याचे आवाहन केले आहे. शास्त्रज्ञ डॉ. तारा प्रभाकरन या प्रमुख असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या 35 किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी विमानतळावर दोन विमाने तैनात असतील. कृत्रिम पावसासाठी वातावरण तयार झाल्यानंतर प्रयोग करण्यात येणार आहे. पाऊस पाडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.