वॉशिंग्टन – साधारणपणे प्रत्येक नागरिकालाच प्रवासाची आवड असते त्यातही जगप्रवास करून विविध अनुभव घेणे अनेकांना आवडते अमेरिकेतील एका जोडप्याने मात्र टोकाची भूमिका घेतली असून या जोडप्याने संपूर्ण घरदार आणि आपला उद्योग विकून उर्वरित आयुष्य फक्त जगप्रवास करण्यामध्येच व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे जॉन हेनेसी आणि मेलडी हेनेसी असे या जोडप्याचे नाव असून ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथील रहिवासी आहेत काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता घरदार विकले या व्यतिरिक्त त्यांचा जो व्यवसाय होता तो सुद्धा विकला आणि त्यांना जे उत्पन्न झाले त्यातून त्यांनी जगप्रवासाची मोहीम सुरू केली आहे.
आपले उर्वरित आयुष्य क्रुझवरील प्रवासामध्येच व्यतीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आम्ही दैनंदिन आयुष्य जगत असतो तर आम्हाला जेवढा खर्च आला असता त्याच्यापेक्षा निम्मा खर्च आम्हाला प्रवासी आयुष्य जगत असताना येत आहे असे त्यांचे म्हणणे आहे जोडप्याने आपली सर्व संपत्ती विकून जे पैसे मिळाले त्यातून एक मोटरहोम विकत घेतले आहे म्हणजे हे एक प्रकारचे तरंगते घरच असते पाण्यावर तरंगणाऱ्या या मोटारहोमच्या माध्यमातूनच ठिकठिकाणी प्रवास करून हे जोडपे आपला काल व्यतीत करत असते सध्या हे जोडपे एका वर्षभराच्या कालावधीसाठी कॅरिबियन क्रूजवर असून या माध्यमातूनच ते विविध आफ्रिकी देशांना भेट देणार आहेत.
या देशात परत आल्यावर ते पुन्हा एकदा आपल्या मोटारहोमच्या माध्यमातून पाण्यावरील आयुष्य सुरू करणार आहेत याव्यतिरिक्त एका मोठ्या जहाजावर कायमस्वरूपी वास्तव्य करण्याच्या दृष्टिकोनातूनही त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत जगात काही कंपन्या क्रूजवर लोकांना असे कायमस्वरूपी वास्तव्य देण्याचे काम करत आहेत अशा काही कंपन्यांशी वाटाघाटी करून त्यांच्या क्रूजवर उर्वरित आयुष्य कायमस्वरूपी घालवण्याचा विषयही या जोडप्याने केला आहे सर्वसाधारणपणे जमिनीवरील घरात राहत असताना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा खर्चाचे विषय समोर येतात त्यापैकी कोणतीच गोष्ट आम्हाला पाण्यावर राहत असताना अडचणीची ठरत नाही असे या जोडप्याचे म्हणणे आहे.