शिवमोगा/बेळगाव – विमान प्रवास आज सर्वसामान्यांसाठीही वरदान ठरत आहे. देशाचे नागरिक “मेक इन इंडिया’ अंतर्गत लवकरच संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानातून प्रवास करु शकतील. आज शिवमोग्गाला स्वतःचे विमानतळ मिळाले आहे, ते अतिशय भव्य आणि सुंदर आहे. हा विमानतळ म्हणजे या प्रदेशातील सैनिकांच्या स्वप्नांचे एक नवीन उड्डाण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कर्नाटकातील बेळगाव जवळच्या शिवमोगा जिल्ह्यातील नव्या विमानतळाचा शुभारंभ मोदींच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आकाशातून पाहिले असता, या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलाप्रमाणे असून नागरी उड्डाणासाठीची सर्व आधुनिक उपकरणे असलेला हा कर्नाटकातला सहावा विमानतळ ठरला आहे.
मोदी पुढे म्हणाले की, आज मला पुन्हा एकदा कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. वाहन असो वा सरकार… दुहेरी इंजिन लावले तर त्याचा वेग अनेक पटींनी वाढतो. पूर्वी जेव्हा कर्नाटकच्या विकासाची चर्चा व्हायची तेव्हा ती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती, पण आमचे सरकार विकास कर्नाटकातील खेड्यापाड्यापर्यंत, टियर-2 आणि टियर-3 शहरांपर्यंत नेण्याचे काम करत आहे.
Celebrating the nature, culture and agriculture of Karnataka. pic.twitter.com/296s1FOzfH
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
पंतप्रधान म्हणाले, एअर इंडिया कॉंग्रेसच्या काळात घोटाळ्यांसाठी ओळखली जात होती. तोट्यात चालणाऱ्या बिझनेस मॉडेलच्या रूपात ही कंपनी असायची, पण आज ‘एअर इंडिया’ भारताची नवी क्षमता म्हणून जगात एक नवे उड्डाण, नवी उंची घेत आहे. आज भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा डंका जगभरात वाजत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारतातील नागरिक ‘मेड इन इंडिया’ विमानातून प्रवास करतील.
पंतप्रधान म्हणाले, “कॉंग्रेसचा असा विचार कधीच नव्हता की लहान शहरेही हवाई मार्गाने जोडली जावीत. आज देशातील अनेक छोट्या शहरांमध्ये आधुनिक विमानतळ आहेत. भाजप सरकार किती वेगाने काम करत आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. चांगल्या कनेक्टिव्हिटीसह पायाभूत सुविधा या संपूर्ण प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणार आहेत, यावर आमच्या सरकारचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
We are making great progress in our efforts to ensure tap water connection to the people of Shivamogga. pic.twitter.com/EanHtJVUDX
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
माता-भगिनींसाठी सरकारी नळपाणी अभियान –
पीएम मोदींनी नळपाणी अभियानाची खासियत सांगितली. आज शिवमोगा आणि या भागातील माता-भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू आहे. प्रत्येक घरापर्यंत नळाला पाणी पोहोचवण्याचे हे अभियान आहे. भाजप सरकार हे गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे, भाजपचे सरकार हे गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार आहे. भाजपचे सरकार माता-भगिनींचा स्वाभिमान, माता-भगिनींना संधी आणि माता-भगिनींच्या सक्षमीकरणाच्या मार्गावर चालणारे सरकार आहे.
The double engine Governments have helped Karnataka across sectors. pic.twitter.com/fPKeQNn4Sb
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
त्यानंतर पंतप्रधान बेकलागावी जिल्ह्याला भेट दिली. येथे जल जीवन मिशन अंतर्गत 2,500 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले. या योजनेमुळे दोन्ही जिल्ह्यातील 13 लाख लोकांना फायदा होणार आहे.
पीएम-किसान लाभार्थ्यांना 13 वा हप्ता जारी –
मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 13 वा हप्ता जारी केला. या हप्त्याअंतर्गत 2000 रुपये. शेतकऱ्यांना देण्यात येणार आले. या योजनेंतर्गत आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 16,800 कोटी रुपये थेट जमा केले जात आहेत.