त्रिशूर – केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरिन्जादापल्ली श्री कृष्ण मंदिरात आता विधीसाठी खऱ्या हत्तीऐवजी रोबोटिक हत्ती वापरण्यात येणार आहे. हे हत्ती मंदिर समिती अभिनेत्री पार्वती थिरुवोथूसह पेटा इंडिया या स्वयंसेवी संस्थेने सादर केले आहेत. या यांत्रिक हत्तीची उंची साडेदहा फूट असून त्याचे एकूण वजन 800 किलो आहे. या हत्तीवर चार जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विद्युतीय पद्धतीने चालतात.
केरळच्या मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींमध्ये हत्तीला खूप महत्त्व आहे. तथापि, काहीवेळा हे हत्ती विधीदरम्यान किंवा त्यापूर्वी संतप्त होतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना जीव गमवावा लागतो. या कारणास्तव, त्रिशूरच्या इरिंजदापल्ली श्रीकृष्ण मंदिर समितीने धार्मिक विधींसाठी हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. यावर प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पेटा इंडिया या संस्थेने हा रोबोटिक हत्ती मंदिरात सादर करण्याचा निर्णय घेतला. रविवारी मंदिरात ‘नादायरुथल’ हा धार्मिक विधी पार पडला. या विधीचा भाग म्हणून देवाला हत्ती अर्पण केला जातो.
पेटा इंडियाचे म्हणणे आहे की, कैदेत ठेवल्यामुळे अनेक वेळा हत्ती चिडतात. जेव्हा त्यांच्या इच्छेविरुद्ध काम केले जाते तेव्हा ते कहर करतात आणि त्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. हेरिटेज ऍनिमल टास्क फोर्सच्या अहवालानुसार केरळमध्ये गेल्या 15 वर्षांत हत्तींच्या हल्ल्यामुळे 526 लोकांचा मृत्यू झाला आहे.
चिकट्टुकवू रामचंद्रन नावाचा हत्ती केरळच्या सणांमध्ये सर्वाधिक वापरला जातो. या हत्तीने सहा माहूत, चार महिला आणि इतर तीन हत्तींसह 13 जणांचा बळी घेतला आहे. यामुळेच त्रिशूरच्या इरिन्जादापल्ली श्रीकृष्णाने पूजा-उत्सवात हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. इतर मंदिरेही असे पाऊल उचलतील, अशी आशा मंदिर समितीने व्यक्त केली आहे.