– शिवशंकर निरगुडे
हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावातील पिण्याच्या पाण्यातील हातपंपामध्ये एक जीवाणू आढळून आला आहे. तो जीवाणू रबरावाणी तानत आहे. अंदाजे तीन फूट लांब तो जीवाणू तानत आहे.
त्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे. गावात एकच हात असून, याच पंपावरील ग्रामस्थ पाणी पितात आता हा दुर्मिळ जीवाणू आढळून आला आहे. त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील घोरदरी हे गांव अति दुर्गम भागात आहे. आता पावसाळा चालू झाला असून, त्यामुळे दूषित पाणी पील्याने अनेक जन आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही हा जीवाणू नेमका काय आहे? हे काय कळू शकले नाही.
आरोग्य विभागाकडून तात्काळ घोरदरी गावातील हातपंपाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात यावे आणि हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही ते सांगावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
आढळून आलेला हा जीवाणू घोरदरी येथील शेतकरी दत्तराव नागूलकर यांनी एका बॉटल मध्ये भरून ठेवला आहे. नेमका हा जीवाणू काय आहे हे कळाले नाही. आता आरोग्य विभागाच्या वतीने गावात येऊन हा प्रकार काय आहे? अशी मागणी ग्रामस्था करत आहेत.