अहमदाबाद – बिहार विधानसभा निवडणुकांसह देशात विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. आज गुजरातमध्येही विधानसभेच्या जागेसाठी मतदान सुरु असून येथे भाजप व काँग्रेसमध्ये प्रमुख लढत असल्याचं चित्र आहे. अशातच काँग्रेसतर्फे एक खळबळजनक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यात भाजप कार्यकर्ता चक्क मतदारांना पैसे वाटताना दिसत आहे.
काय आहे व्हिडीओ?
व्हिडिओमध्ये काही लोक एका रिक्षात बसलेले दिसत आहेत. यानंतर तेथे एक तरुण हातात २ हजारांच्या नोटा घेऊन येतो. तो रिक्षात बसलेल्या सर्वांच्या हातात दोन हजारांची एक-एक नोट देत एक नंबरच चिन्ह असलेल्या कमळापुढील बटण दाबण्यास सांगतो. यानंतर तो कमळ म्हणजे भाजप असंही म्हणताना दिसतोय.
काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
हा व्हिडीओ कर्जन मतदारसंघातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने याबाबतची तक्रार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. मुरलीकृष्ण यांच्याकडे केली आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराजसिंह परमार यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
काँग्रेसवरही पैसे वाटप केल्याचा आरोप
कथित भाजप कार्यकर्त्याचा पैसे वाटप करतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
BJP often boasts of its booth management and panna pramukh. This is BJP’s booth management that has been exposed in Por Itala area of Karjan constituency in #Gujarat. I seek immediate action by @CEOGujarat and @ECISVEEP. pic.twitter.com/OClVfJZctG
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) November 3, 2020