मुंबई – संत सेवालाल महाराज यांचे वंशज बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे काल (30 ऑक्टोबर) रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरीदेवी संस्थानचे प्रमुख होते.
श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 17 ऑक्टोबरला त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्रास अधिक वाढल्यामुळे त्यांचे काल रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. रामराव महाराज यांच्या निधनाने संपूर्ण बंजारा समाजासह राज्यावर शोककळा पसरली आहे.
बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली🙏 pic.twitter.com/x3lZbNu3GT
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 31, 2020
रामराव महाराज हे 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसले होते. तेंव्हापासून त्यांनी अन्नत्याग केला होता. ते फक्त कडूनिंब, फळं आणि दूध सेवन करत असत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना दूध घेतानाही त्रास होत होता. म्हणून ते फक्त फळांचा रस आणि कडूनिंब याचेच सेवन करत असत. मात्र, श्वास घेण्यास होणारा त्रास वाढल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थान हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून हे ठिकाण राज्यात प्रसिद्ध आहे. रामराव महाराज यांच्या निधनानंतर राज्यासह देशभरातील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
Shri Ramrao Bapu Maharaj Ji will be remembered for his service to society and rich spiritual knowledge. He worked tirelessly to alleviate poverty and human suffering. I had the honour of meeting him a few months ago. In this sad hour, my thoughts are with his devotees. Om Shanti. pic.twitter.com/o1LjExjSWH
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
संत सेवालाल महाराजांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचे निधन दुःखद आहे. लोकशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महत्कार्य त्यांनी घडविले.
तपस्वी रामराव बापू महाराजांवर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या अनुयायांच्या दुःखात सहवेदना! भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 31, 2020
बंजारा समाजाचे धर्मगुरू तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधिपती डॉ. रामराव महाराज यांच्या निधनामुळे बंजारा समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असणारे, समाजाला नवी दिशा देणारे महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/aL0cH3X132
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 31, 2020
देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान, वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी संस्थानचे प्रमुख आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या अनुयायांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/GjlZVwEKQW
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 31, 2020
पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती, बंजारा समाजाचे ऊर्जास्त्रोत धर्मगुरु डॉ.रामराव बापु महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझं भाग्यच! डॉ.रामराव बापू महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/NZTpAOvFFh
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 31, 2020