न्यूयॉर्क : अमेरिकेत यावरची होत असलेली अध्यक्षपदाची निवडणूक सर्वात खर्चिक ठरणार असून यावेळी तब्बल १४ अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे गेल्यावेळपेक्षा दुप्पट खर्च होईल असे बोलले जात आहे
‘द सेंटर फॉर रेस्पॉनसिव पॉलिटिक्स’ या संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या महिन्याभरात राजकीय पक्षांच्या देणग्यांमध्येही भरीव वाढ झाली आहे या निवडणुकीसाठी ११ अब्ज डॉलर्स खर्च होतील असा प्राथमिक अंदाज होता पण हा आकडा १४ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल असे आत या संस्थेला वाटत आहे
डेमोक्रेटिक पार्टीचे उम्मीदवार जो बाइडेन यांच्या खात्यात यावेळी १ अब्जपेक्षा जास्त देणगी जमा झाली असून आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासातील कोणत्याही उमेदवाराला मिळालेली हि सर्वात जास्त देणगी आहे रिपब्लिक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प याना ६० कोटी डॉलर्सची देणगी मिळाली आहे यावेळी देणगी देण्यात महिलांचा वाट अधिक आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे