नगर -लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाची मालमत्ता कर भरु शकत नसल्यामुळे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी लवकरात लवकर 100 टक्के शास्तीमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मनपा विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक गणेश भोसले, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शहर जिल्हा महिला अध्यक्ष रेश्मा आठरे, नगरसेवक अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, प्रकाश भागानगरे, सागर बोरूडे, बाळासाहेब पवार, निखील वारे, सुनिल त्रिंबके, समद खान, विपुल शेटीया, राजेश कातोरे, अंजली गायकवाड, साधना बोरूडे, रंजना उर्किडे, सुनंद कांबळे, भरत गारूडकर आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार म्हणाले की, सायंकाळी मनपा अधिकारी यांची शास्ती माफी संदर्भात बैठक घेवून विविध सुचना केल्या आहेत. शहराची 102 कोटी रूपयाची शास्ती माफीची रक्कम थकीत असून, मालमत्ता धारकांना किती टक्के शास्ती माफी दिल्याने फायदा होईल मालमत्ताधारक किती रक्कम भरतील याचा आढावा सुरू आहे. याबाबत बुधवारी सायंकाळ पर्यत शास्ती माफीचा निर्णय घेतला जाईल. तसेच 26 लाख रूपयाचे लाईटच्या साहित्याची खरेदी
केली आहे.