नवी दिल्ली – आता नागरिकांना पीव्हीसी म्हणजे पॉलिविन्यल क्लोराईड आधार कार्ड मिळणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे 50 रुपये पाठविल्यास पुन्हा छापलेले हे कार्ड मिळेल. हे कार्ड एटीएम किंवा डेबिटकार्डसारखे असून ते अधिक काळ टिकते. त्यावरील छपाई अधिक चांगली आहे. त्यात सुरक्षितताविषयक अनेक वैशिष्टयांचा समावेश करण्यात आला आहे.
क्यूआरआर कोडच्या माध्यमातून ऑफलाइन फेर तपासणी तात्काळ होते. यावर कार्ड जारी केल्याची तारीख आणि प्रिंट केल्याची तारीख असते. यासाठी पन्नास रुपयाच्या शुल्कासह नोंदणी केल्यानंतर पाच दिवसांमध्ये स्पीड पोस्टाद्वारा हे आधार कार्ड पाठविण्यात येते.