मुंबई- अभिनेता भरत जाधव अनेक वर्षांनी टीव्ही मालिकेत कमबॅक केलं आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेतून भरत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका कलर्स मराठीवर प्रक्षेपित केली जाणारअसून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भरत जाधव अनेक वर्षांपासून पडद्याआड आहेत. काही नाटकांद्वारे ते प्रेक्षकांच्या संपर्कात येत असतात मात्र काही दिवसांपासून त्यांच्या वाटेला हवी तशी भूमिका आली नसावी. केदार शिंदे यांची ही मालिका आहे त्यांनी सोशल मीडियावर या मालिकेचा टीझर पोस्ट केला आहे.
एका साध्या, सर्वसामान्य माणसाची गोष्ट सांगणारी मालिका केदार घेऊन येत आहेत. भरत आणि केदारची जोडी या मालिकेतून हीट ठरणार का? हे पहाणं महत्वाचं आहे.