पुणे – गोखले कन्स्ट्रक्शन्सचा नवरात्रीतील गृहमहोत्सव यंदा डहाणूकर कॉलनी स्पेशल असणार आहे. डहाणूकर कॉलनीत एकाच वेळी 9 निवासी गृहप्रकल्प सादर करण्यात येणार असल्याची माहिती, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी दिली.
ग्राहकांना निवडीसाठी 1, 2, 3 व 4 बीएचके प्रकारातील सदनिकांचे पर्याय आहेत. नवरात्रीच्या काळात या गृहप्रकल्पांमध्ये घर घेणाऱ्यांसाठी काही अटीवर रुपये 9,999 (नऊ हजार नऊशे नव्याण्णव) प्रति चौरस फूट इतका विशेष सवलतीचा दर आहे.
डहाणूकर कॉलनी व्यतिरिक्त शहरातील विविध ठिकाणी साकारत असलेल्या गृह-प्रकल्पांवर देखील काही सवलती देणार आहे. यामध्ये आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, रामबाग कॉलनी, बावधन, पटवर्धन बाग, कर्वेनगर, प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना, मुकुंदनगर, सुभाषनगर, औंध व बोपोडी आदी निवासी भागांचा समावेश आहे.
नवरात्रीदरम्यान नवीन गृहप्रकल्प सादर करण्याबरोबरच पूर्णत्वास आलेल्या 9 गृहप्रकल्पांचे ग्राहकांना हस्तांतरण करण्यात येते. ही परंपरा यावर्षी देखील कायम ठेवण्यात गोखले कन्स्ट्रक्शन्सला यश आले आहे. या व्यतिरिक्त 26 ते 29 मे, 2020 या लॉकडाऊनच्या काळात 114 सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले.