मुंबई – देशभरात करोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अलीकडेच बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर पुन्हा एकदा बिग बी कामावर परतले आहे. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजेच, “कौन बनेगा करोडपती’चा 12 वा सीजन सध्या अमिताभ होस्ट करत आहेत. हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला स्क्रीनवर पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद होत आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात दर शुक्रवारी ‘करमवीर’ स्पेशल एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये समाज कल्याणासाठी काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा किंवा फाऊंडेशनचा सन्मान केला जातो. त्यांच्याबरोबर केबीसीचा हा खेळ खेळला जातो. नुकतंच ‘करमवीर’ स्पेशल एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून, केबीसीचा हा प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
The best gift one can give is the gift of life. This Friday, meet our #KBCKaramveer Dr Sunil Shroff, founder of MOHAN Foundation, an organization that has been championing the cause of organ donation. Watch him on the hotseat with our champion Ritesh Deshmukh in #KBC12 at 9PM. pic.twitter.com/aj0MVvv2Ou
— sonytv (@SonyTV) October 8, 2020
यंदाच्या शुक्रवारी या स्पेशल एपिसोडमध्ये मोहन फाऊंडेशनचे संस्थापक आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. सुनील श्रॉफ दिसणार आहेत. मोहन फाऊंडेशन गेल्या दोन दशकांपासून अवयवदानासंदर्भात काम करत आहे. आणि याच एपिसोडमध्ये आणखी एक खास चेहरा दिसणार आहे. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता ‘रितेश देशमुख’ याचा. हो यंदाच्या ‘करमवीर’ स्पेशन एपिसोड मध्ये डॉ. श्रॉफ यांच्या बरोबर रितेश सुद्धा हॉटसीटवर बसून केबीसीचा खेळ खेळणार आहे.
दरम्यान, प्रोमो मध्ये पहिल्या नुसार केबीसीच्या हॉटसीटवर रितेश काहीसा भावुक झाल्याचं दिसून येत आहे. अलीकडे रितेश व त्याची पत्नी जेनेलिया यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला होता. याच संकल्पामागचा उद्देश रितेशने केबीसीमध्ये सांगितला आहे. रितेश म्हणाला आहे की, ‘गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मनात होतं की काहीतरी केलं पाहिजे. जिवंतपणी मी माझ्या वडीलांसाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मी माझे शरीर तंदुरूस्त ठेवतो.’ असं तो म्हणाला. यावेळी केबीसीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि रितेशचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram