मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बिहार पोलिस तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे चांगलेच चर्चेत होते. बिहार निवडणूक जवळ आल्यानंतर तर ते जास्तच चर्चेत आले. पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूत प्रवेश करत थेट राजकारणात उडी घेतली. मात्र जेडीयूने जाहीर केलेल्या 115 उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नाही. त्यामुळे नोकरीही गेली आणि उमेदवारीही गेली आता पांडे काय करणार अशी चर्चा रंगली आहे.
Giving an election ticket to Gupteshwar Pandey (former Bihar DGP) is a matter of the party. We had asked whether BJP leaders will campaign for him. It was maybe due to fear of this question that he was not given a ticket: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/i011I9qTGk
— ANI (@ANI) October 8, 2020
दरम्यान,पांडेना आता भाजपाचा आधार मिळण्याची आशा आहे. कारण बक्सर मतदारसंघातून भाजपाने अजून आपले उमेदवार घोषित केलेले नाही. यावरूनच राष्ट्रवादीनं चिमटे काढत भाजपावर निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,’गुप्तेश्वर पांडे (बिहारचे माजी पोलीस महासंचालक) यांना तिकीट देणं हा पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही असा प्रश्न विचारला होता की, भाजपाचे नेते त्यांचा प्रचार करतील का? कदाचित या प्रश्नाच्या भीतीमुळेच त्यांना तिकीट दिलं गेलं नसावं,’ असा टोला देशमुख यांनी लगावला.
तत्पूर्वी ही अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल उपस्थित केला होता.