मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा काही दिवसांपूर्वी दिला.
दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या या महत्त्वाच्या निकाला नंतर सोशल मीडियावर अभिनेत्री ‘कंगना राणावत’ला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. #KanganaAwardWapasKar हा ट्रेंड सोशल मीडियामध्ये सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केलं होते. त्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येला तिने खून असल्याचं म्हंटलं होत. त्यामध्ये दावे खोटे ठरले तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं कंगनानं म्हणाली. यासंदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. आता एम्स रुग्णालयाच्या निकालानंतर नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलेच ट्रोल केले आहे.
ये है मेरा इंटर्व्यू अगर याददाश्त कमज़ोर हो तो फिर से देखें, अगर मैंने एक भी झूठा या ग़लत आरोप लगाया हो, तों मैं अपने सारे अवार्डस वापिस कर दूँगी, ये एक क्षत्रिय का वचन है, मैं राम भक्त हूँ, प्राण जाए पर वचन ना जाए, जय श्री राम 🙏#KanganaAwardWapasKar https://t.co/j6H8zLsuEp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 7, 2020
दरम्यान, कंगनाने #KanganaAwardWapasKar या ट्रेंडसह एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने आपल्या मुलाखतीची देखील लिंक शेअर केली आहे. “ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मृती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, मी एखादा खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचे वचन आहे, मी रामाची भक्त आहे. जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही’, असं उत्तर कंगनानं दिलं आहे.