मुंबई -बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते.
मिळालेल्या माहितीनुसार दीपिका चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली त्यावेळी दीपिकाला रडू अनावर झालं. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.या चौकशीदरम्यान दीपिकाने ड्रग्सचं सेवन केल्याचं नाकारलं. त्याचसोबत व्हॉट्स अॅप चॅट खरे असल्याची कबुली दिली.
दरम्यान अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली.