आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही-संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. दरम्यान, त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चाना उधाण आले होते. दरम्यान, या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होते ते समोर आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: फडणवीस भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं आहे.

काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण करोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले.

‘सामना’च्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणीस यांना बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. शनिवारी आम्ही भेटल्यानंतर गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव टाकरेही मोदींना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा त्यांन मानतो, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.