सातारा – सातार्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याला साठ लाखांची खंडणी मागणार्या महिलेला शाहूपुरी (सातारा) पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबधित महिला व सातार्यातील एकाचे प्रेम संबंध जुळले होते. त्यानंतर ते दोघे व्हिडिओ काॅलवरून एकमेकांसोबत संपर्क करत होते. दरम्यान, दोघांनी एकमेकांसोबत अश्लिलपणे व्हिडिओ कॉलिंग सुरू ठेवले होते. त्या व्हिडिओ कॉलिंगची स्क्रीन सेव्ह करून ती व्हायरल करण्याची भिती दाखवत संबंधिताला त्या महिलेने ब्लॅकमेल करून साठ लाख रुपये मागितले.
बदनामीच्या भितीपोटी संबधितांने त्या महिलेला साठ लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यातील बारा लाख रुपये दिले होते. त्यानंतर राहीलेल्या पैशांसाठी त्या महिलेने तगादा लावल्याने संबधितांने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून खंडणीचे पैसे घेताना त्या महिलेला रंगेहात पकडले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून खंडणीच्या पहिल्या हप्त्यातील पैशातून खरेदी केलेले दहा लाख रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.