बंगळुरू – बंगळुरू पोलिसांनी येथील एका गावात जमिनीखाली लपवलेला जवळपास साडेतेराशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
कलबर्गीजवळील कलगी येथील एका भागात एका शेळी फार्ममध्ये जमिनीखाली हा गांजा पुरून ठेवण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी टाकलेल्या धाडीत हा साठा हस्तगत करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या चार व्यक्तींमध्ये एक जण रिक्षाचालक असून तो शालेय विद्यार्थांना याचा पुरवठा करत होता, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या चारही व्यक्ती कर्नाटकसह महाराष्ट्रातही हा गांजा वितरित करत होते.