सोशल मीडियावर आलिया भटचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. पण त्या सगळ्यांकडून तिला नेहमीच लाईक्स मिळतात असे काही नाही. अलीकडेच तिच्या एका फोटोसेशनला चक्क नेटकऱ्यांनी डिसलाईकही केले आहे. सेलिब्रिटी डब्बू रतनानीने केलेल्या फोटोसेशनपैकी एक जूना फोटो रतनानीने शेअर केला होता.
हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. मात्र अनेकांना हा फोटो पसंत पडला नाही. त्या फोटोच्या पोस्टवर अनेकांनी डिसलाईक केले. या फोटोमध्ये आलिया एका स्वीमिंग पूलमध्ये बसलेली दिसते आहे. कॅमेऱ्याकडे बघून ती हसते आहे, इतका साधा फोटोही नेटकऱ्यांना आवडला नाही. या फोटोबरोबर “डिसलाईक’चे बटण का नाही ? असा सवाल काही जणांनी विचारला.
अलिकडे आलियाच्या प्रत्येक पोस्टवर सोशल मिडीयावर विचित्र कॉमेंट पडत आहेत. नेटकऱ्यांकडून तिला सातत्याने ट्रोल केले जाऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने आपल्या पोस्टवर कॉमेंटचा ऑप्शनच काढून टाकला होता. तिने आपल्या पोस्टवर कॉमेंट करता येणार नाही, असे सेटिंग बदलून टाकले होते. कारण आलियाच्या पोस्तच्या कॉमेंटमध्ये जाऊन लोकांनी चक्क शिवीगाळही करायला सुरुवात केली होती. ओटीटीवर रिलीज झालेल्या “सडक 2’ला देखील लक्षावधी लोकांनी डिसलाईक केले होते.