सातारा : जिल्ह्यात बाधितांचा नवा उच्चांक

921 नागरिकांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मंगळवारी (दि. 8) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 921 नागरिक करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा ओलांडला असून प्रशासन व आरोग्य विभागापुढील आव्हान अधिक कठीण झाले आहे.

कराड तालुक्‍यामध्ये कराड शहरात कार्वे नाका 11, सोमवार पेठ, बुधवार पेठ प्रत्येकी सहा, शनिवार पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ प्रत्येकी चार, श्री हॉस्पिटल तीन, गुरुवार पेठ, शिवाजी हौसिंग सोसायटी, श्रद्धा क्‍लिनिक प्रत्येकी दोन, मंगळवार पेठ, साईनगर, राम मंदिराजवळ प्रत्येकी एक, इतरत्र 30, मलकापूर शहरात 22, कोयना वसाहत, आगाशिवनगर प्रत्येकी सात, कृष्णा हॉस्पिटल दोन, पार्ले 15, उंब्रज, सैदापूर प्रत्येकी 13, वारुंजी सात, कार्वे, कासारशिरंबे प्रत्येकी सहा, चचेगाव, शेरे, कापिल, काले प्रत्येकी पाच, ओगलेवाडी, ओंड प्रत्येकी चार, गोळेश्‍वर, येरवळे, बनवडी प्रत्येकी तीन, आटके, बेलवडे बुद्रुक, शेणोली स्टेशन प्रत्येकी दोन, मसूर, केसे पाडळी, कुंभारगाव, चिंचोळी, महारुगडेवाडी, मालखेड, वाठार, अणे, वाण्याचीवाडी, कुसूर, विहापूर, कोळे, मारुल कोळे, घारेवाडी, तावडे, बनवडी कॉलनी, वहागाव 1, अभयाचीवाडी, येळगाव, सपकाळवाडी, शेणोली, साकुर्डी, मुंढे, येळगाव, राजमाची, विंग, विरवडे, गोमेवाडी, उत्तर कोपर्डे, नांदलापूर प्रत्येकी एक,

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात मंगळवार पेठ, सदरबझार प्रत्येकी दहा, सोमवार पेठ आठ, गोडोली सहा, गुरुवार पेठ पाच, शनिवार पेठ, चिमणपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ, शाहूनगर प्रत्येकी चार, राधिका रोड, विसावा नाका प्रत्येकी तीन, बुधवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, भवानी पेठ, प्रतापगंज पेठ, केसरकर पेठ, पंताचा गोट प्रत्येकी दोन, सदाशिव पेठ, रामाचा गोट, शुक्रवार पेठ, लोणार गल्ली, मल्हार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र 23, शाहूपुरीत करंजे दहा, दौलतनगर तीन, सिद्धीविनायक हौसिंग सोसायटी, मोळाचा ओढा प्रत्येकी एक, इतरत्र 11, बारवकरनगर 14, खावली दहा, संभाजीनगर आठ, सैदापूर सात, कृष्णानगर सहा, किडगाव चार, ठक्कर सिटी, लिंब, कोडोली, निनाम, पाडळी प्रत्येकी तीन, विलासपूर, संगमनगर, काशीळ, एमआयडीसी, हनुमाननगर (नुने), देगाव, कुमठे, आष्टे प्रत्येकी दोन, चिंचणेर निंब, निसराळे, खेड, अपशिंगे, मत्यापूर, अतीत, वेचले, कामेरी, सोनगाव, आरळे, राऊतवाडी, गोवे, खोकडवाडी, ठोसेघर, संगम माहुली, जकातवाडी, गणेशनगर, पीरवाडी, वाढे, वाढे फाटा, सांबरवाडी, पाटखळ, सारखळ, न्यू विकासनगर, श्रीनगर कॉलनी, विठ्ठल कृपा सोसायटी प्रत्येकी एक,

पाटण तालुक्‍यात कोयनानगर चार, रामापूर, मल्हारपेठ प्रत्येकी तीन, नाडे दोन, पाटण, तारळे, अरवडे, ढेबेवाडी, खुटारे, मंद्रुळ कोळे, अडुळ, मोळावडेवाडी, मारुल हवेली, कोटोळी प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यातील फलटण शहरात मलठण नऊ, लक्ष्मीनगर आठ, भडकमकरनगर दोन, कसबा पेठ, डेक्कन चौक, रविवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र दोन, सस्तेवाडी आठ, चौधरवाडी, गिरवी प्रत्येकी पाच, बागेवाडी, जाधववाडी, कोळकी प्रत्येकी चार, मिरडे, तरडगाव, आसू, वडले प्रत्येकी तीन, कापशी, गोखळी, विडणी प्रत्येकी दोन, निरगुडी, पाडेगाव, दुधेबावी, घाडगे मळा, धनगरवाडा, निंबळक, खटके वस्ती, आदर्की खुर्द, साखरवाडी, सालपे प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यामध्ये वाई शहरात गणपती आळी आठ, गंगापुरी पाच, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी प्रत्येकी चार, शहाबाग तीन, धर्मपुरी, रविवार पेठ, फुलेनगर, ब्राह्मणशाही प्रत्येकी दोन, रामडोह आळी, लखननगर, जेजुरीकर कॉलनी, यशवंतनगर, शिवाजीनगर प्रत्येकी एक, इतरत्र चार, जांभ नऊ, वरखडवाडी, कवठे प्रत्येकी चार, भुईंज तीन, चिखली, वेळे, सुरुर, अबेपुरी प्रत्येकी दोन, वेळे, ओझर्डे, बावधन, व्याजवाडी, धोम पुनर्वसित, पसरणी, किकली, कुसगाव प्रत्येकी एक,

खंडाळा तालुक्‍यात शिरवळ, पळशी प्रत्येकी आठ, पाडेगाव सात, खंडाळा पाच, कोपर्डे, लोणंद प्रत्येकी चार, पाडळी, बावडा प्रत्येकी तीन, भादे, जावळे, अतीट, वाठार बुद्रुक प्रत्येकी दोन, भोसलेवाडी, पाडळी, खेड बुद्रुक, बोहळी प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात वाकेश्‍वर नऊ, वरुड सहा, पुसेसावळी चार, खटाव, बुध प्रत्येकी तीन, कातरखटाव दोन, मिरजे, चितळी, वडूज, पुसेगाव प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात म्हसवड 28, दहिवडी, गोंदवले खुर्द प्रत्येकी तीन, मार्डी दोन, महिमानगड, भाटकी, पानवण प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात रहिमतपूर सात, कोरेगाव सहा, कुमठे, तारगाव प्रत्येकी तीन, बोरगाव, तडवळे, जळगाव, आसरे, सुभाषनगर, पिंपोडे बुद्रुक, सुर्ली, वाठार किरोली, भोसरे, जांभ, आर्वी, बोरगाव प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात खर्शी, मेढा प्रत्येकी पाच, पिंपळी, भिवडी, बामणोली, कुडाळ, दरे खुर्द, मेढा, सायगाव, महाबळेश्‍वर तालुक्‍यात चिखली सात, महाबळेश्‍वर चार, पाचगणी दोन, तापोळा तीन, दांडेघर 1, इतर 32, बाहेरील जिल्ह्यांमध्ये इस्लामपूर, सांगली प्रत्येकी दोन, वाटेगाव, सुरुल, बाबालेश्‍वर (कर्नाटक), नालासोपारा, येडेमच्छिंद्र (जि. सांगली), निरली (जि. कोल्हापूर) प्रत्येकी एक, असे एकूण 921 जण पॉझिटिव्ह आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.