शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील एका विवाहितेने घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शीतल दीपक ढमढेरे (वय 33, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अनिल किसनराव ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शीतल ढमढेरे हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.