केतकावळे -भिवरी (ता पुरंदर) येथे काही दिवसांपूर्वी संतोष दळवी याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खुनी हल्ल्यातील आरोपी मोहन लक्ष्मण गायकवाड याला जामीनावर सोडले होते. त्याच्या घरावर काहींनी पाळत ठेवून त्याच्या घरावर हल्ला चढवला.
यामध्ये रोहन मोहन गायकवाड (वय 25) हा जखमी झाला. याबाबत त्याने सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. मोहन गायकवाड यांच्या घरावर आरोपींनी पाळत ठेवून मोहन कोठे आहे असे विचारत त्याच्या घरात शिरकाव केला.
आईच्या व बहिणीच्या डोळ्यांत मसाला टाकून तलवार व कोयत्याने मारहाण केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.