मुंबई – एकीकडे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्या प्रकरणातून मनोरंजन विश्व सावरलं नसताना आता आणखी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या रित्या घरी सापडला आहे. अभिनेता आणि मॉडेल ‘समीर शर्मा’ याचा मृतदेह मुंबईतील त्याच्या राहत्या घरी किचनमधील सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. समीरने ‘कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, रिश्ता क्या केहलता है सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. समीरच्या जाण्यानं संपूर्ण मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर शर्मा गेल्या काही दिवसांपासून कोणालाच भेटला नव्हता. जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा सोसायटीच्या चौकीदाराने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जेव्हा घर उघडलं तेव्हा समीरचा मृतदेह सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मात्र यावेळी समीरच्या घरात पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
His neighbours had complained that a foul smell was coming from his residence. When a guard went there, he saw that doors of the kitchen were open & he was hanging from the ceiling: Dinesh Bubna, Secretary of the housing society in Mumbai where TV actor Sameer Sharma was residing https://t.co/QAH4C9v6CD pic.twitter.com/rRR2dDUoCa
— ANI (@ANI) August 6, 2020
याबाबत अधिक माहिती देताना मलाड पोलिसांनी, टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मा काल रात्री मालाड पश्चिम येथील निवासस्थानी आपल्या किचनच्या सिलिंगला लटकलेला आढळला. याप्रकरणी अपघाती मृत्यू अहवाल नोंदविण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृत शरीराची स्थिती पाहता, त्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा संशय आहे.” असे सांगितले.
TV actor & model Sameer Sharma was found hanging from his kitchen ceiling at his residence in Malad West last night. Accidental Death Report registered, body sent for autopsy. Looking at body’s condition, it’s suspected that he died by suicide two days back: Malad Police. #Mumbai
— ANI (@ANI) August 6, 2020