कोल्हापूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री आणि औषधे खरेदीसाठी देवस्थान समितीतर्फे १ कोटी रुपयांच्या निधी धनादेश जिल्हा प्रशासनाकडे आज सुपूर्द करण्यात आला आहे.
२७ जुलैला जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, सीईओ अमन मित्तल आणि महापालिका आयुक्त कलशेट्टी यांच्याबरोबरच्या बैठकीत देवस्थान समितीने कोरोनाशी लढण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन देवस्थान समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज एक कोटीचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपर्द केला.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कलशेट्टी देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव देसाई, राजेंद्र जाधव उपसचिवर शितल इंगवले, सुयश पाटील, उत्तम मिटके उपस्थित होते.