नऱ्हे – सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू, नऱ्हे दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवत 100 टक्के निकाल लावला. यातून सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू नऱ्हेच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दहावी परीक्षेला एकूण 80 विद्यार्थी बसले होते, त्यांच्या कठोर परिश्रमाने 100 टक्के निकालाची परंपरा राखली गेली. ऋतुजा नंदकुमार पाटील 91.40 टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तसेच द्वितीय क्रमांक पूर्वा धन्वकुमार बोगाळे 89 टक्के, तृतीय क्रमांक अवंतिका राजकुमार पाटील 88.60 टक्के तसेच चौथा क्रमांक आयुष प्रशांत जगताप 88.40 टक्के तर पाचवा क्रमांक साहिल सुधीर वाल्हेकर 88.20 टक्के याचा आला. 90 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 63.75 टक्के विद्यार्थ्यांनी 70 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. 30 टक्के विद्यार्थ्यांनी 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
जे.एस.पी.एम. संस्थेचे संस्थापक मा. आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व विश्वस्त मा. ऋषिराज सावंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालिका शीतल ताक यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल, अशा शब्दांत सिग्नेट पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता परबत यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.