मुंबई – महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच, अमिताभ बच्चन यांची कोरोनातून सुखरूप सुटका झाली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं वृत्त एका नामांकित वृत्तवाहिनीने दिलं होत. मात्र हे वृत्त खोटं असल्याचा निर्वाळा आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी केला आहे.
या वृत्ताबाबत संताप व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं असून सोबतच वृत्तवाहिनीचा ‘तो’ व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. याबाबत लिहताना अमिताभ यांनी, ‘ही बातमी चुकीची, बेजबाबदार, बनावट आणि अक्षम्य खोटारडेपणाची आहे !!’ अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
.. this news is incorrect , irresponsible , fake and an incorrigible LIE !! https://t.co/uI2xIjMsUU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 23, 2020
तत्पूर्वी, अमिताभ व अभिषेक बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ११ जुलै रोजी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र यानंतर आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी पसरली होती.
अमिताभ, अभिषेक यांच्यासोबतच ऐश्वर्या व आठ वर्षीय आराध्यालाही करोनाची बाधा झाली आहे. या चौघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. अमिताभ यांना कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांची प्रकृती उत्तम असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत असं रुग्णालयाकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. याखेरीज अमिताभ हे स्वतः रुग्णालयात असले तरी सोशल मीडियावर सक्रिय आहेत.