पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांची मागणी
पुणे(प्रतिनिधी) – प्रथमच देशात आर्थिक आणीबाणी ओढावली असून कर भरणारा व्यापारी वर्ग कर्ज बाजारी झाला आहे. याची केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दखल घेणे आवश्यक आहे. ठराविक रक्कमेपर्यंत व्यवसायिक कर्ज माफ करावीत तसेच पुढील कर्जाला शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करुन द्यावीत. छोट्या व्यवसायीकांसाठी कर्ज योजना आखावी, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केली आहे
करोनाचा प्रादुर्भावामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री सोडता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. आता थोडा वेळ जरी दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली, तरी अपेक्षित व्यवसाय नाही. काहींनी परिस्थितीची जाणीव ठेवून दुकानाच्या भाड्यामध्ये सवलत दिली आहे.
तर काहींनी दिली नसल्याचे सांगून निवंगुणे म्हणाले की, दुकानदारांचे बॅंकेचे हप्ते चालूच असून, ज्यांनी अर्ज देऊन हप्ते थांबविले आहेत. त्यांना व्याज सुरूच आहे. कामगारांचा पगार, मेंटनन्स, कर सुरूच आहेत. त्यातच घर खर्चही सुरु असल्याने स्वत:ची आणि परिवाराची करोनाची जोखीम सुरु आहे. किराणा , मेडिकल, बेकरी, चिकन, मटन, दुध वगळता इतर सर्व व्यापार बंद आहे. त्या व्यापाऱ्यांचे कुटुंब मेटाकुटीला अले आहे.
या पार्शभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करोनाच्या या संकट प्रसंगी एक वेगळा पॅटर्न तयार करणे गरजेचे आहे, जर हे छोटे व्यापारी जगले तरच देशातील अर्थ व्यवस्था नक्कीच सुधारले, अन्यथा बाहेरील देशातील भांडवलदार छोट्या व्यवसायात उतरून आपला देश पोखरूण काढतील, पुढे जाऊन देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीतीही निवंगुणे यांनी व्यक्त केली