अॅड. मंगेश लेंडघर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी
पुणे(प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामपंचायत, सार्वजनिक संस्था, बॅंका आणि पतसंस्थाच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यावर प्रशासक नेमण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. तज्ज्ञ म्हणून अधिकाधिक वकिलांना प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी अॅड. मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
याबाबतचा ई-मेल बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. सुभाष घाटगे यांना केला आहे.
न्याय व्यवस्थेतील महत्त्वाच घटक असलेल्या वकिलांना कायद्याचे ज्ञान असते. त्यामुळे प्रशासक म्हणून अधिक सक्षमपणे काम करू शकतात. त्यामुळे त्यांना अधिकाधिक संधी देण्यात यावी, असे लेंडघर यांनी म्हटले आहे. त्यांनी यापूर्वी दहा वर्षापर्यंत सनद असलेल्या वकिलांना स्टायपेंड देण्याची मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.