ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने 18 जुलै 2020 रोजी आपला 38वा वाढदिवस साजरा केला. तिच्या चाहत्यांनी, कुटूंबियांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करून तिच्या शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केले आहे. यानिमित्त तिचा पति निक जोनासने दोघांची एकत्रित फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
निक जोनासने प्रियांकाबरोबर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने बर्थडे नोट देखील पोस्ट केली आहे. या फोटोत प्रियांका निकच्या मांडीवर बसली आहे आणि दोघे एकमेकांच्या नजरेत नजर भिडविताना दिसत आहेत.
निकने लिहिले की, मी आयुष्यभर तुमच्या डोळ्यात डोकावू इच्छित आहे. आय लव यू बेबी. आजपर्यंत मी ज्या लोकांना भेटलो त्या सर्वांमध्ये तू एक बुद्धिमान, समजुतदार आणि हुशार व्यक्ती आहेस. आपण एकमेकांना भेटलो याबद्दल मी कृतज्ञ आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
View this post on Instagram
दरम्यान, निकचे वडील केविन जोनस यांनीही प्रियांकाला तिच्या इंस्टाग्राम हॅंडलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रियांकाच्या रोका सेरीमनीच्या फोटोसह त्यांनी प्रियांका चोप्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तु आमच्या कुटुंबात आनंद घेवून आलीस. लव यू. तसेच प्रियांकाचा भाउ सिद्धार्थ चोप्रानेही तिला बर्थ डे विश केले.