पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील जवळा येथे पारनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 75 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच यावेळी दोघांना अटक केली. शनिवारी (दि.18) रात्री ही कारवाई करण्यात आली.
राहुल पोपट सालके व सुदाम शंकर पठारे (दोघे रा. जवळा, ता. पारनेर) यांनी बांधकाम सुरू असलेल्या जागेवर दारू साठा केल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी व पोलीस उपनिरीक्षक बोत्रे यांच्या पथकाने या जवळा येथे छापा घालून 75 हजार 30 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच सालके व पठारे यांना ताब्यात घेतले. आरोपींविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.