देहूरोड (प्रतिनिधी) – विकासनगर येथे 42 वर्षीय इसमाने राहत्या घरात आत्महत्या केली. नैराश्यातून आत्महत्या केले असल्याचे समजत असून सोमवारी (ता.६) सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली.
हरिश गावडे (वय ४२, रा.विकासनगर, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गावडे हा व्यवसायाने वाहन चालक असून लॉकडाऊनमध्ये काही दिवसांपासून या परिसरात तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. मात्र त्याच्या खोलीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. मला जीवन जगता आले नाही म्हणून मी माझे जीवन संपवीत आहे. माझे आयुष्य एवढेच होते. माझ्या मृत्यूची जबाबदारी केवळ माझी आहे. माझ्या मृत्युनंतर माझ्या पत्नीला काहीही बोलू नये, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत लिहिलेला आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक निलेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गंभीर जखमी असलेल्या गावडे याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. देहूरोड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.