नगर – सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आहे. विविध स्तरावर प्रशासनाने उपाययोजना करुन, जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहे. त्यात सर्वांचा सहभाग व संघटीत प्रयत्न आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
जिल्हा वारकरी सेवा संघाच्या कार्यालयास चाकणकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत, पुणे मनपाच्या नगरसेविका गलांडे, सुभाष राऊत, सतीश राऊत, निता व श्रावणी राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी विश्वनाथ राऊत यांनी चाकणकर यांना वारकरी सेवा संघाच्या कार्याची माहिती दिली. तसेच सेवा संघाच्यावतीने करोना बंद काळात राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.