नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्व असलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली.
राष्ट्रपती भवन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या भेटीनंतर ट्विट करण्यात आले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये १ जूनला चीनी आणि भारतीय सैन्य दलांच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर पंतप्रधानांनी लेहला भेट दिली आणि जवानांना संबोधित केले. या चकमकीत भारताच्या 20 सैनिकांना वीरगती मिळाली होती.
#WATCH Prime Minister Narendra Modi called on President Ram Nath Kovind and briefed him on the issues of national and international importance at Rashtrapati Bhavan today pic.twitter.com/YPqOxAvtuK
— ANI (@ANI) July 5, 2020