नवी दिल्ली – जीएसटीआर-3बी हा फॉर्म भरण्यास उशीर झाला तरी यावरील विलंब शुल्क जुलै 2020 पर्यंत 500 रुपयांच्या आत राहणार आहे. जीएसटीआर-3बी हा फॉर्म मासिक व तिमाही विक्री विवरण आणि कर भरण्यासंदर्भात असतो.
ही सवलत जुलै 2017 म्हणजे जीएसटी सुरू झाल्यापासून ते जुलै 2020 या कालावधीसाठी लागू आहे. मात्र, हे विवरण 30 सप्टेंबर 2020 पूर्वी सादर करावे लागेल. जरा थकित कर नसेल तर विलंब शुल्क लागणार नाही.