पुणे(प्रतिनिधी)- पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री केल्याप्रकरणात वाकड पोलिसांनी अटक केलेल्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांनी जामीन मंजुर केला आहे.
अजमद सलीम पठाण (वय 31, रा. थेरगाव) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. वाकड पोलिसांनी 27 जून रोजी कारवाई करत त्याच्या घरातून 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. पठाण याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला.
भारतीय दंड संहिता कलम 328 येथे लागू होत नाही. केवळ त्याने उत्पादीत केलेल्या वस्तुंची विक्री केली असल्याचा युक्तीवाद अॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी केला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाड्याचा दाखला न्यायालयात दिला.