नवी दिल्ली – केंद्र सरकारने आता ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनाही ईडीच्या रडारवर घेतले आहे. संदेसरा बंधुंच्या मनिलॉडिरींग केसशी अहमद पटेल यांचा संबंध असल्याच्या संशयावरून त्यांची ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आज सकाळी ईडीचे तीन अधिकारी पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. आणि त्यांनी त्यांचे या संबंधीचे म्हणणे नोंदवून घेतले. ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याची दोन वेळा समन्स बजावली होंती. पण त्यांनी ही समन्स पाळली नव्हती, तुम्ही घरी येऊनच चौकशी करू शकता, अशी सूचना अहमद पटेल यांच्याकडून ईडीला करण्यात आली होती. ती सूचना मान्य करून तेथे चौकशी पथक पाठवण्यात आले होते.