इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धा
मॅंचेस्टर -ऍन्थोनी मार्शलने नोंदवलेल्या अफलातून हॅट्ट्रिकच्या जोरावर मॅचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत शेफिल्ड युनायटेडचा 3-0 असा दणदणीत पराभव केला व स्पर्धेतील आघाडी कायम राखली.
सामन्याला सुरुवात झाल्यानंतर मार्शलने 7 व्या मिनिटांलाच पहिला गोल केला व शेफिल्ड संघावर वर्चस्व राखण्यास प्रारंभ केला. त्यांचा बचाव अत्यंत सुमार होता व त्याचा लाभ मार्शलने घेतला. त्यानंतर पहिला हाफ संपण्यापूर्वी मार्शलने आणखी एक गोल केला व संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यावेळी शेफिल्ड संघाच्या खेळाडूंवर प्रचंड दडपण आले.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना किमान बरोबरीत सोडविणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी दुसरा हाफ सुरू झाल्यावर अनेच चाली रचल्या मात्र, मॅंचेस्टर संघाने त्यांचे इरादे यशस्वी होऊ दिल्या नाहीत. मात्र, आपली गुणवत्ता व दर्जा पुन्हा एकदा सिद्ध करत मार्शलने पुन्हा शेफिल्डचा बचाव भेदला आणि 77 व्या मिनिटाला संघाचा व स्वतःचा तिसरा गोल केला. याद्वारे त्याने यंदाच्या स्पर्धेतील पहिलीच हॅट्ट्रिक पूर्ण केली. या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील विविध स्पर्धांमध्ये मिळून 19 वा गोल नोंदवला.