नगर (प्रतिनिधी) – सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केल्यामुळे नगर शहरात विकास कामे दिसू लागली आहे. विकास कामात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्र. 7 मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक वाकळे म्हणाले, आ. जगताप यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी मला दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. प्रभागातील विकासकामे दर्जेदार व्हावी, यासाठी कामावर प्रत्यक्ष उभे राहून चांगल्या दर्जाचे काम करून घेतल्यामुळे अनेक वर्षे ही कामे टिकलेली आहेत.