नगर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरुन आमदार गोपिचंद पडळकर यांनी सर्वांचीच मने दुखावली आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी मांडली.
शहर-जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांनी निवेदन स्वीकारले. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहर-जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अमित खामकर, महिला सचिव सायरा शेख आदी यावेळी उपस्थित होते.
विधाते म्हणाले, “”ज्येष्ठ नेते शरद पवार देशाच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिलेले आहेत. समाजातील अनेक वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.”