कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसचे आमदार तमोनाष घोष यांचे आज येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना करोनाची बाधा झाल्याचे गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या चाचणीत निष्पन्न झाले होते. ते 60 वर्षांचे होते. 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदार संघातून तीन वेळा ते आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांना करोना झाल्याचे निदान झाले होते. त्यातच त्यांना हदय व मूत्रपिंडाचाही विकार होंता.
त्यांच्या विकाराची गुंतागुंत वाढत गेली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ते आपले गेल्या 35 वर्षांचे राजकीय सहकारी होते. त्यांनी समाजकारण आणि राजकारणात मोठे विधायक योगदान दिले आहे अशा शब्दात त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.