नवी दिल्ली -सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) 5 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे दिल्लीतील ईडीचे मुख्यालय 48 तासांसाठी सील करण्यात आले. आता सोमवारी ते मुख्यालय कामकाजासाठी उघडले जाईल.
दिल्लीतील लोकनायक भवनमध्ये ईडीचे मुख्यालय आहे. त्या इमारतीमध्ये इतरही कार्यालये आहेत. त्या कार्यालयांमध्ये याआधी काही करोनाबाधित आढळले. त्यामुळे खबदारीचा उपाय म्हणून ईडीने आपल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची करोनाविषयक चाचणी घेतली. त्यामध्ये ईडीचे 5 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले.
त्यानंतर ईडीचे मुख्यालय सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईडी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महत्वाची यंत्रणा आहे. काळा पैसा, हवाला गुन्हे, मनी लॉण्डरिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास ईडीकडून केला जातो.